नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग नवव्यांदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी कायम राहण्याची किमया साधलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्स इंडियाच्या माहितीनुसार, अंबानी यांच्या एकूण संपत्तीत झपाट्याने वाढ होत असून ती संपत्ती 22.7 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलीये. अंबानी यांची ही संपत्तीत युरोप खंडातील इस्टोनिया देशाच्या जीडीपीइतकी आहे. 


सन फार्माचे दिलीप संघवी यांची संपत्ती 16.9 अब्ज डॉलर असून ते भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा परिवार 15.2 अब्ज संपत्तीसह तिसऱ्या स्थानी आहे. 


विप्रोचे अझीम प्रेमजी हे देशातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एकूण 15 अब्ज डॉलर संपत्ती आहे जी मोझाम्बिक देशाच्या 14.7 अब्ज डॉलर जीडीपीपेक्षाही अधिक आहे. पल्लोनजी मिस्त्री यांची संपती 13.90 अब्ज डॉलर असून ते यादीत पाचव्या स्थानी आहेत.