मुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेशवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.
अखिलेशवर टीका करत त्यांनी म्हटलं की, 'जो त्याच्या पित्याचा नाही झाला तो अजून कोणाचा कसा होऊ शकतो.'
मैनपुरीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असतांना मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं की त्यांच्या इतका अपमान याआधी कधी नव्हता झाला. 'मी अखिलेशचा मुख्यमंत्री केलं पण त्याने माझं नाही ऐकलं.'
मुलायम यांनी भारतीय राजकारणाचं उदाहरण देत म्हटलं की, 'कोणत्याही वडिलांनी स्वत: असतांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री नाही बनवलं. पण मी असं केलं. त्यांनी लहान भाऊ शिवपाल सिंह यादव यांचा अपमान करत काकांनाही मंत्रीपदावरुन काढून टाकलं. ज्यांनी त्याला जीवनात एक चांगला रस्ता दाखवला. माझा जीवनासोबतच माझा सर्वात अधिक अपमान झाला आहे.'