मुलायम सिंह यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष नावाची पाटी हटवली
मुलायम सिंह यांच्या सहमती शिवाय पक्षाचा अध्यक्ष बनल्यानंतर अखिलेश यादव आता त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, त्यांना वडिलांचा आशिर्वाद मिळाला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या मुख्यालयावरुन ही मुलायम सिंह यादव यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नावाची नेमप्लेट हटवण्यात आली आहे. त्याजागी नवी नेमप्लेट लावण्यात आली आहे. ज्यामध्ये मुलायम सिंह यांना पक्षाचे संरक्षक म्हटलं गेलं आहे.
लखनऊ : मुलायम सिंह यांच्या सहमती शिवाय पक्षाचा अध्यक्ष बनल्यानंतर अखिलेश यादव आता त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, त्यांना वडिलांचा आशिर्वाद मिळाला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या मुख्यालयावरुन ही मुलायम सिंह यादव यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नावाची नेमप्लेट हटवण्यात आली आहे. त्याजागी नवी नेमप्लेट लावण्यात आली आहे. ज्यामध्ये मुलायम सिंह यांना पक्षाचे संरक्षक म्हटलं गेलं आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जवळपास 20 दिवसानंतर मुलायम सिंह यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नावाच बोर्ड हटवण्यात आला असून त्या जागी संरक्षक असा बोर्ड लावण्यात आला आहे. मुलायम यांच्या नेमप्लेट खाली अखिलेश यादव यांच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली असून त्यांच्या नावाखाली अध्यक्ष असं म्हटलं गेलंय.