लखनऊ : मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हाय ब्लडप्रेशरचा त्यांना त्रास झाला आहे. डॉक्टर त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षामध्ये वाद पेटला आहे. समाजवादी पक्षात काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. वाद-विवादामध्ये यादवी सापडली आहे.


शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन तर अमर सिंह यांना देखील पक्षातून काढलं आहे. मुलायम सिंह यांनी रामगोपाल यादव, किरनमय नंदा आणि नरेश अग्रवाल यांना देखील पक्षातून काढून टाकलं आहे. समाजवादी पक्षात अजूनही महाभारत संपलेलं नाही.