मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट ३,३०० रुपये!
नवी दिल्ली : सध्या मुंबई ते अहमदाबाद दुरान्तो एक्सप्रेसचे एसी फर्स्ट क्लासचे भाडे २ हजार २०० रुपये आहे. जपानच्या सहकार्याने चालविण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनचे फर्स्ट क्लास एसीचे भाडे सध्याच्या तिकीट भाड्याच्या दीडपट होणार आहे. म्हणजेच ३ हजार ३०० रुपये ठेवण्याचा विचार रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत सांगितले.
बुलेट ट्रेनचा मार्ग आणि कोचेस सर्वकाही जपान सरकारकडून तंत्रज्ञान आयात करुन बांधण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बुलेट ट्रेनचा मार्ग :
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर मुंबई बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि साबरमती ही स्थानके असणार.
किती तासात प्रवास?
- गाडी सर्व स्थानकांवर थांबवल्यास मुंबई ते अहमदाबाद या संपूर्ण प्रवासासाठी २ तास ५८ मिनिटे लागतील, तर काही स्थानके वगळून धावल्यास ५०८ किलोमीटर कापण्यासाठी केवळ २ तास ७ मिनिटे लागतील.
ताशी किती वेग?
- बुलेट ट्रेनच्या कमाल वेग ताशी ३५० किलोमीटर असणार असून प्रत्यक्षात गाडी ३२० किमी वेगाने धावेल.