मुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर
भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे.
मुंबई : भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे. ट्रीप अॅडवायजरनं हे सर्वेक्षण केलं आहे. हे सर्वेक्षण करताना फोर स्टार हॉटेलचं तीन दिवसांचं भाडं, दोन्ही वेळचं जेवण आणि टॅक्सी यांच्या दरांचा विचार करण्यात आला आहे. पुण्यामध्ये हा खर्च 26,595 रुपये इतका आहे.
मुंबई हे भारतातलं सगळ्यात महाग शहर असलं तरी जगभरात मुंबई हे दुसरं सगळ्यात स्वस्त शहर आहे. अमेरिकेचं न्यूयॉर्क हे सगळ्यात महाग शहर आहे. या शहरामध्ये तीन दिवसांचा खर्च 1,24,201 रुपये एवढा येतो. मुंबईतल्या दृष्टीनं हा खर्च तिप्पट आहे.
दक्षिण आफ्रिकेतलं केप टाऊन जगातलं तिसरं सगळ्यात स्वस्त शहर आहे. यानंतर मलेशियातलं क्वालालंपूर, थायलंडमधलं बँकॉक आणि रशियातल्या मॉस्कोचा नंबर लागतो.