बिहार : बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या आमदाराच्या मुलाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीये. रॉकी यादव असं त्याचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री गया इथं पोलीस लाईनजवळून जात असताना रॉकीच्या SUVला आदित्य सचदेव या 10वीतल्या मुलानं ओव्हरटेक केलं. यावरून झालेल्या वादावादित रॉकीनं गोळ्या झाडून आदित्यची हत्या केली होती. 


दोन दिवसांपासून तो फरार होता. त्याची आई मनोरमा यादव या बिहार विधान परिषदेत आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आशिर्वादानंच रॉकी दोन दिवस फरार होऊ शकला, अशी टीका भाजपनं केलीये. 


दरम्यान, रॉकीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल तसंच त्याची गाडी जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.