हैदरबाद : तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याच्या निषेध म्हणून द्रमुकच्यावतीने चेन्नईमध्ये उपोषण, आंदोलनाला सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं होतं. याचा निषेध करण्यासाठी द्रमुकच्या वतीने चेन्नईमध्ये उपोषण आंदोलनाला सुरुवात झालीय. या आंदोलनात द्रमुकच्या कार्यकर्त्यांसह स्वतः एम.के. स्टॅलिनही या आंदोलनात सहभागी झालेत. तामिळनाडू विधानसभेत ई.पलानीस्वामी यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकने गोंधळ घातला होता. त्यावेळी विरोधी पक्षातील द्रमुकच्या आमदारांनी मतदानाची मागणी केली.


मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळलल्यावर एकच गोंधळ सुरु झाला. द्रमुक आमदारांनी विधानसभेत कागद फाडून अध्यक्षांवर फेकले. त्यानंतर विधानसभेत खुर्च्या फेकून देण्यात आल्या. द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदारोळ केल्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर काढल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी सध्या द्रमुकनं उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.