संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला
आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे. सरफराज हुसैन असं त्याचं नाव आहे. 600 पैकी 590 मार्क त्यानं मिळवलेत.
विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यानं चालणा-या गुवाहाटीमधल्या शंकरदेव शिशु निकेतन स्कूलचा तो विद्यार्थी आहे. आसामचे शिक्षणमंत्री हेमंत सरमा यांनीही सरफराजचं कौतुक करत त्याच्या कुटुंबाला सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत विद्या भारतीची शाळा उघडली जाईल, अशीही घोषणा सरमा यांनी केली. बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय मुल्यांचे विचार रुजवले पाहिजेत, असं सरमा म्हणालेत.