नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घातपाच्या दृष्टीने दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून अँटी ट्रोन टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रमुख मार्गांवर वाहनांची कसून तपासणी सुरु आहे. तर राजपथावरील सुरक्षेसाठी उंच इमारतींवर विमानरोधक गनसह जवानांना तैनात करण्यात आले आहे.


दहशतवादी जवानांच्या वेशात हल्ला करण्याचीही शक्यता वर्तवल्यानं सुरक्षा कर्मचा-यांचीही कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, मुंबईतही बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानबरोबर तणावलेले संबंध या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणतीही अनुचित घटना  घडू नये यासाठी दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालय सज्ज झालंय. राजपथ आणि परिसरात फरार दहशतवाद्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तसंच, कोणती काळजी घ्यावी,याच्या सूचनाही ठिकठिकाणी देण्यात आल्यात.