नवी दिल्ली : 'तीन तलाख' पद्धतीला विटलेल्या एका मुस्लिम तरुणीनं सोमवारी एका हिंदू मुलाशी हिंदू पद्धतीनं विवाह केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना जोधपूरहून जवळपास १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या फलोदी गावात घडलीय. इथल्या एका मंदिरात या जोडप्यानं हिंदू पद्धतीनं एकमेकांना आजन्म साथ देण्याचं वचन दिलंय. 


विवाहानंतर, हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा आपल्याला लहानपणापासून आकर्षित करत आल्याचं या तरुणीनं म्हटलंय. हा धर्म सुरक्षित आणि महिलांचा सन्मान करणारा असल्याचंही तिचं म्हणणं आहे. 


मुस्लिम समाजात मुलीचं मत विचारात न घेताच तिचा 'निकाह' लावून देण्याची परंपरा निरर्थक असल्याचं तिनं म्हटलंय.