नवी दिल्ली : गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपनं सत्ता स्थापन करण्याच्या रस्सीखेचमध्ये आघाडी घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपने मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलाय.


भाजप विधिमंडळ गटाचे नेते एन. बिरेन सिंग यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केलाय. प्रादेशिक्ष पक्ष आणि एक अपक्ष पाठबळ मिळवत भाजपनं 31 ची मॅजिक फिगर गाठलीय. 


32 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बिरेन सिंग राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना सादर केल्याची माहिती भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीय. 


दरम्यान, ओक्राम इबोबी सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. मंगळवारी राजीनामा देणार असल्याचं सांगणाऱ्या इबोबी सिंग यांनी सोमवारी रात्रीच आपला राजीनामा राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्याकडे सुपूर्द केलाय.


मावळत्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय नव्या सरकार स्थापनेच्या हालचाल करु शकत नसल्याचं राज्यपाल हेपतुल्ला यांनी म्हटलं होतं. त्यामुळे रात्री उशिराच ओक्राम इबोबी सिंग यांनी राजीनामा दिलाय.