नवी दिल्ली : दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भारत सरकारकडे सोपवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ते शिक्षण क्षेत्रात परत जातील असं म्हटलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजीब जंग यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अनेक वेळा मतभेद समोर आले आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार देखील मानले आहेत.


राजीनामा दिल्यानंतर त्यांनी म्हटलं की, ते पुन्हा शिक्षण क्षेत्रात जाणार आहेत. ते राज्याचे २० वे उपराज्यपाल होते.


जुलै २०१३ मध्ये त्यांनी उपराज्यपाल या पदाचा कार्यभार सांभाळला होता. उपराज्यपाल बनण्याआधी ते जामिया मिल्लिया इस्लामिया यूनिवर्सिटीचे कुलपती होते.