नारायण राणे यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट, दिले हे स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप पक्ष प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चाला पूर्ण विराम दिलाय. आज राणे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीची भेट घेतली.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप पक्ष प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चाला पूर्ण विराम दिलाय. आज राणे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीची भेट घेतली.
मी काँग्रेसमध्ये आहे, असे राहुल गांधींच्या भेटीनंतर नारायण राणेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले नारायण राणे यांनी आज आपण पक्ष सोडून भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्षात समाधानी असल्याचे सांगत पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दरम्यान, त्यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांनीही वडिलांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले होते. मात्र, नारायण राणेंकडून कोणतेही भाष्य आले नव्हते. आज खुद्द त्यांनीच स्पष्टीकरण दिल्याने भाजप प्रवेश चर्चेला पूर्ण विराम मिळाला.