`भक्तांनी` रचली नरेंद्र मोदींची आरती
मुंबई : नरेंद्र मोदी आणि त्यांची असणारी लोकप्रियता याच्या अनेक कहाण्या आपण आजवर ऐकल्या असतील.
मुंबई : नरेंद्र मोदी आणि त्यांची असणारी लोकप्रियता याच्या अनेक कहाण्या आपण आजवर ऐकल्या असतील. नरेंद्र मोदींच्या काही चाहत्यांना इंटरनेटवर 'भक्त' म्हणण्याचीही प्रथा आहे. काही दिवसांपूर्वी मोदींच्या नावे मंदिर स्थापन केल्याचा वादही झाला होता.
पण, आता मात्र याच भक्तीचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. आता चक्क त्यांच्या काही भक्तांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक आरती रचली आहे आणि ती 'ओम जय जगदीश हरे'च्या तालात गायली आहे. २०१४ साली यू-ट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. तो आता इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. श्री. धर्मेश कोठारी यांनी ही आरती रचली आणि गायली आहे.