वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वारणसीमध्ये विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. नोटाबंदीला विरोध करणाऱ्याचा समाचार घेताना मोदींनी त्यांची तुलना पाकिस्तानशी केली.


नोटा बंदीच्या त्रासातून जाणाऱ्या सव्वाशे कोटी जनतेला प्रणाम करतो असंही मोदी म्हणाले. राहुल गांधींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही मोदींनी जोरदार खिल्ली उडवली.