मोदींच्या इशाऱ्यामुळे मीडियाचा कॅमेरामॅन बचावला
गुजरातचे उपमुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की, मोदींनी इशारा केला नसता, तर मीडियाचा कर्मचारी पाण्यात वाहून गेला असता.
सौनी : गुजरातचे उपमुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की, मोदींनी इशारा केला नसता, तर मीडियाचा कर्मचारी पाण्यात वाहून गेला असता. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये पाणी पुरवठा योजना सौनी योजनेचं उदघाटन मोदींच्या हस्ते झालं, त्यावेळी ही घटना घडली.
धरणाचं पाणी सोडलं जात होतं, तेव्हा मोदींची नजर मीडियाच्या कॅमरामेन्सकडे केली. मोदींना असं लक्षात आलं की काही कॅमेरामन आणि फोटोग्राफर्स ज्या जागी पाणी सोडलं जाणार आहे, त्या ठिकाणी उभे आहेत. त्याच दरम्यान पाण्याची धार प्रचंड वेगाने कॅमेरामनकडे येत होती.
मोदींनी टाळी वाजवली आणि हाताने इशारे करून फोटोग्राफर्सला तुमच्या मागून पाण्याची लाट येत असल्याचा इशारा केला, आणि मीडियाचे कॅमेरामन कॅमेरा सोडून धावले, आणि बचावले, अशी माहिती गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिली.