परीक्षेतील यशासाठी मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
मुंबई : `मन की बात`च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुंबई : 'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना काही मोलाचे सल्ले दिले. त्यातील काही सल्ले पुढीलप्रमाणे -
१. कोणत्याही ताणाशिवाय काम करा. इतर कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वतःकडून ठेवा.
२. परीक्षेच्या दिवसांना एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे करा.
३. परीक्षा म्हणजे अंकांचा खेळ नाही. म्हणून कोणत्याही ताण तणावाशिवाय अभ्यास करा.
४. शारिरीक स्वास्थाप्रमाणेच मानसिक स्वास्थ्यही चांगले राहण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणेही गरजेचे आहे.
५. आपल्या जीवनात शिस्तीचे महत्त्व खूप आहे. म्हणून आपली कामे त्या त्या वेळी करण्यावर भर द्या. उगाच सकाळचे काम संध्याकाळवर टाकू नका.
६. तुमच्याकडे जे काही आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांकडे काय आहे, त्याकडे उगाच लक्ष देऊ नका.
७. अर्जुनाप्राणेच आपल्या निशाण्यावर लक्ष द्या. शरीरातील शांततेचा अनुभव घ्या.
८. परीक्षा केंद्रावर दिल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न काळजीपूर्वक वाचा. वेळ वाया जाईल, असा विचार करू नका. त्यावर छापलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. प्रश्न काय आहे ते समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा.
९. परीक्षेच्या काळात योग करा. ध्यानधारणा करा. तुमच्या नेहमीच्या आयुष्यातही योग समाविष्ट करा.
१०. तुमच्यातील हिंमत कायम ठेवा. तुमच्या उद्दिष्टावर ठाम राहा.