नवी दिल्ली : (रामराजे शिंदे, झी २४ तास) केंद्र सरकारने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपहरणाच्या घटनेतची उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, देशात बिहारमध्ये सर्वाधिक दंगे घडले. तर, त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. 


८ हजारहून अधिक दंगे महाराष्ट्रात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दगडफेकीच्या घटनेतली महाराष्ट्र अव्वल आला आहे. हरियाणातील फरीदाबाद येथे सर्वाधिक जातीय दंगली उसळल्या त्यापाठोपाठ गुजरातमध्ये जातीय दंगली सर्वाधिक झाल्या आहेत.


बलात्काराच्या घटना - २०१५


मध्य प्रदेश - ४ हजार ३९१
महाराष्ट्र - ४ हजार १४४
(यात मुंबईत सर्वाधिक ७१२ आणि पुणे २६६ बलात्काराच्या घटना)
राजस्थान - ३ हजार ६४४
उत्तर प्रदेश - ३ हजार २५
दिल्ली - २ हजार १९९
एकूण - ३२ हजार ३२८


अपहरणाच्या घटना २०१५
उत्तर प्रदेश - १२ हजार
महाराष्ट्र - ८ हजार २५५*
(मुंबईत १ हजार ५८३ आणि पुण्यात ७०७ घटना)
मध्य प्रदेश - ७ हजार १२८
दिल्ली - ७ हजार ७३०


एकूण - ७४ हजार ९९२


अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने दंगे भडकतात. तर, काही वेळा सुनियोजित दंगे केले जातात. दंगे झाल्यानंतर त्याची झळ अनेक कुटुंबांना वर्षानुवर्षे बसते. तरीसुद्धा दंगेच्या घटनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर , बिहारमध्ये सर्वाधिक दंगे घडल्याच्या घटना मागील वर्षी नमूद केल्या आहेत.


दंगे घटना- २०१५


बिहार - १३ हजार ३११
महाराष्ट्र - ८ हजार ३३६ (मुंबईत ३९६ आणि पुण्यात २६०)
उत्तर प्रदेश - ६ हजार ८१३
कर्नाटक - ६ हजार ६०२


एकूण - ६५ हजार २५५ घटना



दगडफेकच्या घटना


महाराष्ट्र - १ हजार २९९* (यात पुण्यात सर्वाधिक ५७ घटना घडल्या तर मुंबईत २०)
मध्य प्रदेश - ८३४
आसाम - ८२६
तमिळनाडू - ६७७


एकूण ६ हजार ९६४


जातीय दंगली
हरियाणातील फरीदाबाद येथील जातीय दंगलीच्या मागील वर्षी २०१ घटना दाखल झाल्या आहेत. त्यात २२० पिडीतांनी तक्रार दाखल केली आहे. त्या पाठोपाठ गुजरातमध्ये १५ दंगली झाल्या आहेत.


सर्वाधिक जातीय दंगली हरियाणातील फरीदाबाद याठिकाणी झाल्या आहेत.



फरीदाबाद - २०१
गुजरातमध्ये १५ दंगली झाल्या. त्यात ४० पीडीत कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे.
सूरत - २
वडोदरा - ८
अहमदाबाद - ५
आग्रा - १४
 


हुंडाबळी


उत्तर प्रदेश - २ हजार ३३५
बिहार - १ हजार १५४
मध्य प्रदेश - ६६४
प. बंगाल - ५००
महाराष्ट्र - २६८  (मुंबईत ९ तर, पुण्यात १७ घटना)


आपल्यावर अन्याय झाल्यामुळे तक्रार करणा-यांचे प्रमाण सर्वाधिक उत्तर प्रदेशात आहे. ७ लाख १० हजार लेखी तक्रारी युपी पोलिसांकडे आल्या आहेत. तर, त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील पोलिसांकडे ५ लाख लोकांनी २०१५ मध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. तर, थेट पोलिस अधिक्षकाकडे ४० हजार लोकांनी लेखी तक्रार केली आहे.