चंदीगड : पंजाबच्या राजकारणाला आज एक नवीन वळण लागलं. भाजपला रामराम केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने नवा पक्ष स्थापन केला आहे. आवाज-ए-पंजाब असं या पक्षाचं नाव आहे. सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धूने याची पुष्टी केली आहे की, परगट सिंह आणि बैंस बंधु यांच्यासोबत सिद्धूने नवा पक्ष तयार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी खेळाडू परगट सिंह हे देखील सिद्धू यांच्यासोबत राजकारणात आले आहेत. फेसबूकवर त्यांनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे. सिरमजीत सिंह और बलविंदर बैंस हे देखील या पक्षामध्ये आहेत. सिद्धू यांच्या पत्नीचं म्हणणं आहे की, पंजाबच्या विरोधात काम करणाऱ्यांविरोधात हा फ्रंट तयार करण्यात आला आहे.


सिद्धूने राज्यसभाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत म्हटलं होतं की त्यांना पंजाबपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. सिद्धू आम आदमी पार्टीमध्ये जातील असं म्हटलं जात होतं, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये देखील जावू शकतात अशा देखील चर्चा होत्या. पण आता ते स्वतंत्र पक्ष स्थापन करतील असं म्हटलं जातंय.