नवी दिल्ली : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घुसून सर्जिकल स्ट्राइक कारवाई करत दहशतवाद्यांचे 8 तळ उद्धवस्त केले. भारताच्या या धडक कारवाईनंतर आजपासून नवरात्र उत्सव सुरु होत आहे. उत्सवाची गर्दी लक्षात घेता घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे देशातील नवी दिल्ली, मुंबई या महानगरांसह संपू्र्ण शहरांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घातपाताची शक्यता लक्षता घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सुरक्षिततेबाबत दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भारत-पाक सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सीमेजवळील अनेक गावांना हलविण्यात आले आहे. दरम्यान, आज पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. अखनूर भागात पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.


पाक व्याप्त काश्मीरमधून भारतात दहशतवादी घुसविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. मात्र भारताने धडक कारवाई करत LOC मध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. राजकीय कोंडी करण्याबरोबरच भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला दहशतवाद्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी लपवाछपवी करावी लागली. 


पाकिस्तानकडून थेट युद्धाची शक्यता नसली तरी काही कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेता, पाकिस्तानच्या कोणत्याही कारवायांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला.