नवी दिल्ली : भाजपच्या विजयाच्या आनंदानंतर भाजप पुढच्या तयारीला लागली असताना तिकडे काँग्रेसमध्ये मात्र हल्लकल्लोळ माजालाय. काँग्रेसच्या नेतृत्वात अमूलाग्र बदल करण्याची वेळ आल्याचं जवळपास सगळेच नेते जाहीरपणे सांगू लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्यांना बाजूला करण्याची मागणी केलीय. तर माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनीही तळापासून वरिष्ठ नेतृत्वात आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय, असं म्हटलंय. तिकडे माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनीही नेतृत्वाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदलाची आवश्यकता असल्याचं म्हटलंय.