तामिळनाडू : आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील बँकांमध्ये आज सकाळपासून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळायला सुरुवात झालीय. आत्तापर्यंत या नोटा देशातील काही नागरिकांकडेच पोहचल्यात... बऱ्याच जणांकडे अजूनही या नोटा पोहचणं बाकी आहे. एव्हानाच तामिळनाडूमध्ये दोन हजारांच्या तब्बल ३६ हजार नोटा सापडल्यात.


तंजावूरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या सर्व्हलांस टीमनं एका गाडीमधून तब्बल ७ करोड ८५ लाख रुपये जप्त केले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये या नोटा सापडल्यात.