नवी दिल्ली : विमान प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. विमान कंपन्यांच्या मनमानीला लगाम लावण्याची सरकारनं तयारी केली आहे. हवाई प्रवास करणा-या प्रवाशांना सोयीसुविधा देण्यासोबतच त्यांच्या खिशाला जास्त चाट लागू नये याची काळजी सरकार घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं तयार केला आहे. या नव्या धोरणानुसार विमान प्रवाशांना होणा-या छोट्यातल्या छोट्या त्रासाबाबत काळजी घेण्यात येणार आहे.


नव्या धोरणानुसार स्थानिक विमानाचं तिकीट रद्द केल्यास त्याचा परतावा विमान कंपन्यांना 15 दिवसांत द्यावा लागणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानाचं तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कंपन्यांनी 30 दिवसांत परतावा देणं बंधनाकर असणार आहे. या सर्व प्रस्तावावर सरकारनं नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. 15 जूनपर्यंत केंद्राचं हे नवं धोरण लागू होण्याची शक्यता आहे.