मुंबई : महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 'मॅट्रिमोनियल साईटस्' अर्थात लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटसवर कडक बंधन घालण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे 'मॅट्रिमोनियल साईटस्' आयटी अॅक्ट २ अंतर्गत येतील. तसंच या साईटसवर येणाऱ्यांना या गाईडलाईन्सचं पालन करणं गरजेचं असेल. काय आहेत या गाईडलाईन्स जाणून घेऊयात... 


मॅट्रिमोनियल साईटसाठी १० गाईडलाईन्स... 


१. सर्व्हिस प्रोव्हायडरला 'ही मॅट्रिमोनियल साईट आहे, डेटिंग साईट नाही' हे जाहीर करावं लागेल.


२. मॅट्रिमोनियल साईटसवर येणाऱ्या युझर्सचं कन्फर्मेशन करणं गरजेचं असेल. 


३. युझर्सनं दिलेल्या माहितीची पुष्टी करणं बंधनकारक असेल.


४. खाजगी माहितीची सुरक्षा अनिवार्य असेल.


५. युझर्सला आपलं ओळख पत्राची कॉपी वेबसाईटवर अपलोड करणं गरजेचं असेल. 


६. सर्व नियम आणि अटींवर वापरकर्त्यांची परवानगी गरजेची असेल. 


७. युजर्सची कोणतीही खाजगी माहिती सार्वजनिक होणार नाही, याची काळजी वेबसाईटना घ्यावी लागणार आहे. 


८. उपयोगकर्त्यांना गैरवापराबद्दल सूचना देणं आणि यासंबंधी माहिती साईटवर अपलोड करणं गरजेचं असेल. 


९. युझर्सला फ्रॉडबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी प्रोत्साहीत करणंही गरजेचं असेल. 


१०. वेबसाईटवर तक्रारीसाठी नियुक्त ऑफिसरशी निगडीत माहिती (उदा. त्यांचा संपर्क क्रमांक) देणं गरजेचं असेल.