४.७ कोटींच्या नव्या नोटा आयकर खात्याकडून जप्त
नोट बंदीनंतर नव्या नोटांची सर्वात मोठी जप्ती आयकर खात्याकडून बंगळुरूत करण्यात आली आहे. बंगळुरू आणि विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण ४.७ कोटीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे.
नवी दिल्ली : नोट बंदीनंतर नव्या नोटांची सर्वात मोठी जप्ती आयकर खात्याकडून बंगळुरूत करण्यात आली आहे. बंगळुरू आणि विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण ४.७ कोटीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे.
दोन सरकारी अभियंते आणि त्यांच्या संबंधीत घरी हे छापे टाकण्यात आले. यात छाप्यात २ हजार रुपयांच्या ४.७ कोटी मूल्याच्या नोटा तर जुन्या ३० लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच २ कोटी रुपयांचे ७ किलो सोने जप्त करण्यात आले.