भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जेलमधून दहशतवादी फरार झाले आणि काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांना ठार केलं. या ऐन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. अनेक वेगवेगळे खुलासे यानंतर होत राहिले. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे की, सिमीच्या या दहशतवाद्यांची साक्ष आणि सुनावणी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे होतं होती. त्यांना कोर्टात नेलं जात नव्हतं. या दरम्यान ते पसार होण्याचा प्रयत्न करु शकतात अशी शंका पोलिसांना होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडवामध्ये 2013 मध्ये जेलमधून कैदी पळून जाण्याच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. मध्यप्रदेश सरकारने यामुळेच या दहशतवाद्यांना जेलच्या बाहेर न नेण्याचा निर्णय घेतला होता. जलमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी कसे यशस्वी झाले याची चौकशी एनआयएकडे सोपवण्यात आली आहे.


या आरोपींच्या वकिलाचं म्हणणं आहे की, आरोपींनी पळून जाण्यास मजबूर केलं गेलं. ते पळून गेले की त्यांना पळवण्यात आला हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे रोज रोज नव्हे खुलासे या प्रकरणात होण्यास सुरुवात झाली आहे.