नवी दिल्ली : योग गुरु बाबा रामदेव यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच पाकिस्तानात जाऊन देखील केलं पाहिजे. भारताला आता अशा हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे कारण लश्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मृत्यूदंड देता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत रामदेव यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदी यांना धोका दिल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करुन काहीही फायदा नाही. जर युद्ध झालं तर पाकिस्तानचं अस्तित्वचं मिटून जाईल असं देखील बाबा रामदेव म्हणाले.


जर भारताचे लोकं पाकिस्तानातील तरुणांना शिक्षणासाठी पैसे दान करु लागले तर तेथील अशिक्षितपणा दूर होईल आणि दहशतवाद संपेल. जर असं झालं तर पंतजली ही सर्वात आधी काम करेल.


पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवरचं देखील त्यांनी समर्थन केलं आहे. रामदेव बाबांनी म्हटलं की, पाकिस्तानातील कलाकारांना कोणीही दहशतवादी नाही म्हणत पण जर सलमान खानला त्यांचा इतकाच पुळका असेल तर त्याने पाकिस्तानात भारतील कलाकारांवर आणि सिनेमांवरील असलेली बंदी उठवून दाखवावी.


रामदेव बाबा यांनी चायनिज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी केली. चीनने भारताला नेहमी धोका दिला आहे आणि पाकिस्तानला साथ दिली आहे. मोदी सरकारने संपूर्ण देशात बीफवर बंदी आणली पाहिजे.