नवी दिल्ली : केरळच्या कोझिकोड आणि कन्नाकमाला जिल्ह्यातून सहा संशयित दहशतवाद्यांना एनआयएने अटक केलीय. हे सर्वजण मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा एनआयएनं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून या सर्वांची मोबाईल संभाषणं ट्रॅक करण्यात येत होती. त्यावरून सगळे जण आयसीसशी संबंधित असल्याचा संशय आल्यानं एनआयएनं त्यांना ताब्यात घेतलंय.  


या कारवाईसाठी केरळ पोलीस, दिल्ली पोलीस, तेलंगणा पोलिसांनी या सहा जणांवर गेल्या काही दिवसांपासून नजर ठेवली होती.