हैदराबाद : हैदराबादमधल्या दिलसुखनगरच्या बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला एनआयए कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासीनसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी १३ डिसेंबरच्या सुनावणीत यासीनसह सर्वांना दोषी ठरवण्यात आलं होतं.  इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना पहिल्यांदाच बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी २०१३ मध्ये केलेल्या या बॉम्बस्फोटात १८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर १३१ जण जखमी झाले होते.