हावडा : जगभरात पोकेमॉन गो या गेमने सगळ्यांना वेड लावलेय. भारतात अद्याप हा गेम लाँच झाला नसला तरी पायरेटेड गेम आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींना तर या गेमने इतकं वेडं केलंय की एका ९ वर्षाच्या चिमुरड्याने चक्क आपलं राहतं घर सोडलंय. अधिकाधिक पोकेमॉन पकडण्यासाठी त्याला मुंबईला यायचयं.


मुंबईला अधिक पोकेमॉन कलेक्ट करता येतील म्हणून तो हावडा येथून मुंबईला येण्यासाठी निघालेला असताना रेल्वे स्थानकावर पोलिसांना तो सापडला. 


हा मुलगा तिसरीत शिकतो. आईला मित्राकडे जातो असे सांगून तो घरातून निघाला. मात्र रात्र झाल्याने आईने घाबरुन हावडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 


यावेळी पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरु केले असता रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो पोलिसांना रेल्वेस्थानकावर आढळला. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पोकेमॉन पकडण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्याने सांगितले.