मुंबई : नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींनी EVM मध्ये छेडछाड झाल्याचे आरोप फेटाळलेत. आम्ही हारत होतो तेव्हा आम्हीदेखील ईव्हीएमवर टीका करत होतो, असं गडकरी म्हणालेत.


दरम्यान EVM हे पूर्वी इतकेच सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. याबाबत अद्याप एकाही पक्षाकडून तक्रार आली नसल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय. बसपानं केलेल्या दाव्याला कोणत्याही विशिष्ट घटनेचा आधार नसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.