नवी दिल्ली : 2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांनी त्यांचं नेतृत्व दाखवून दिलंय. आणि त्यांना जनतेचाही पुरेपुर पाठिंबा आहे. हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय, असंही पवार म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरजही पवारांनी बोलवून दाखवली आहे. हे समविचारी पक्ष एकत्र आले तर त्याचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमार हे प्रबळ दावेदार असतील, असंही पवार म्हणाले आहेत, त्यामुळे 2019 च्या निवडणुकांसाठी तिसऱ्या आघाडीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. 


याशिवाय उत्तरप्रदेशातल्या निवडणूकीत पवारांनी मायावतींच्या बाजूनं कौल दिलाय. शिवाय सोनिया गांधी या काँग्रेसला एकजूट ठेवणारी ताकद असल्याचा पवारांनी पुनरुच्चार केलाय.