पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात आधी दारूबंदी झाली पाहिजे, याशिवाय योगाचा फायदाच काय असा सवाल केा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधील पलामु येथील एका सभेमध्ये बोलताना कुमार यांनी दारूबंदीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना नितीशकुमार बोलत होते.


दारूबंदी आणण्यासंदर्भात कार्यरत असलेल्या महिलांच्या एका संघटनेने या सभेचे आयोजन केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान भाजप सत्ता असलेल्या राज्यांमध्ये तरी दारूबंदी आणावी, असे आवाहन या सभेमध्ये बोलताना कुमार यांनी केले. 


आपण योगासने करत असलो, तरी त्याची प्रसिद्धी करत नसल्याचा टोलाही नितिशकुमार यांनी यावेळी लगावला