नवी दिल्ली: कोणताही मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती १५ दिवसात जाहीर करा, असे आदेश उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. आदित्यनाथ हे शपथविधीनंतर तात्काळ कामाला लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिेले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सचिवांशी देखील चर्चा केली. शपथविधीनंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठका घेणं सुरु केलं. आज त्यांनी उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा केली. 


आदित्यनाथ यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना १५ दिवसात संपत्तीचा तपशील देण्यास सांगितलं आहे. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यातील गोष्टी अजेंड्यावर असतील, असंही स्पष्ट केलं. दरम्यान, आजपासून योगी आदित्यनाथ यांनी आपला मुक्काम आजपासून मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय बंगल्यात हलवला आहे.