नवी दिल्ली : दहा रुपयांचे खोटे नाणे बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल.., मात्र, या साऱ्या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चलनात असलेल्या पण रुपयाचं नवं चिन्ह नसलेली नाणीदेखील खरी असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.


अनेक दुकानदार, व्यापारी, यांच्याकडून 10 रुपयांची नाणी स्विकारली जात नसल्याची तक्रार आरबीआयला मिळली होती. त्यानंतर आरबीआयनं एका सूचनेद्वारे ही नाणी खरी असल्याचा खुलासा केलाय. 


नोटाबंदीनंतर देशात आफवांचं पेव फुटलंय त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील आरबीआयनं केलंय.