नवी दिल्ली : भारत सरकार डिटीजल इंडिया योजनेववर भर देताना दिसतेय. यामुळेच आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही डिजीटल होतंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना टेक्नॉलॉजीनं जोडण्यात येत आहे. यासाठी, सरकारतर्फे बरेच सॉफ्टवेअरही डेव्हलप करण्यात आलेत. आता, या दिशेनं सरकारनं नवी सुरूवात केलीय. याअंतर्गत तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन पेपर आणि पोल्युशन पेपर अर्थात पीयूसीची हार्ड कॉपी तुम्हाला नेहमी जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही.


काय आहे 'एम परिवहन' अॅप


नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर लवकरच एक 'एम-परिवहन' नावाचं अॅप डेव्हलप करणार आहे. या अॅपच्या मदतीनं तुम्ही तुमच्या प्रत्येक गरजेच्या कागदपत्रांची डिजिटल कॉप सांभाळून ठेऊ शकता... आणि महत्त्वाचं म्हणजे ही डिजिटल कॉपी प्रत्येक ठिकाणी मान्य असेल.  


लायसन्सही अॅपवरच होणार रिन्यू


त्यामुळे, तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन पेपर, इन्शुरन्स पेपर आणि पीयूसी सर्टिफिकेट स्कॅन करून त्याची कॉपी आपल्या स्मार्टफोनमध्येही ठेऊ शकता. हे अॅप देशभर मान्य असेल. या अॅपच्या मदतीनं तुम्ही तुमचं लायसन्सही रिन्यू करू शकता. 


तेलंगणात सुरुवातही...


उल्लेखनीय म्हणजे, तेलंगणामध्ये याअगोदरच डिजिटल लायसन्सच्या सुविधेची सुरुवात झालीय. तेलंगना सरकारनं 'आरटीए-एम वॉलेट' नावाचं अॅप लॉन्च केलंय... आणि एका महिन्याच्या आतच हे अॅप जवळपास ६ लाख लोकांनी डाऊनलोडही केलंय.