नवी दिल्ली : नोटा बदलण्यासाठी झेरॉक्स कॉपीची गरज नसल्याचं आरबीआयने सांगितलं असल्याचं, टॉयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र नोटा बदलण्यासाठी आलेल्या व्यक्तीचं ओरिजनल ओळखपत्र बँक कर्मचाऱ्यांना दाखवणं आवश्यक आहे. तसेच त्यासोबत आरबीआयने दिलेला फॉर्म भरणे देखील आवश्यक आहे.


आतापर्यंत बँका नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी देखील फॉर्मसोबत घेत होते, पण ती आता घेण्याची गरज नाही, फक्त ओरिजनल-मूळ ओळखपत्र तपासून पाहावे असे निर्देश आरबीआयने दिल्याचं इंग्रजी दैनिक टॉईम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.