नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर नवीन १००० रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा होती. परंतु १००० रुपयांची नवी नोट येणार नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, १००० रुपयांची नवी नोट येणार नाही. सरकारची एक हजार रुपयांची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नाही. 


त्यामुळे, तुम्हीही नव्या हजार रुपयाच्या नोटेची वाट पाहत असाल तर तुमचा भ्रमनिरास होणार आहे.