नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाला आज 50 दिवस पूर्ण झालेत. सरकारच्या या निर्णयानं देशभरात सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय. आज त्याच अनुषंगानं उपाययोजना करण्यासाठी आज सहा मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीचं अध्यक्षपद आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू  यांच्याकडे असेल. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक समील होतील. सध्या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध आहेत. हे निर्बंध आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. 


सरकारनं चलनतुटवड्यावर मात करण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. . परंतु ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट सारक्षतेची कमरता हा कॅशलेस व्यवहारांमधली सर्वात मोठा अडसर ठरत आहे.