नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक पाऊल उचललंय. भाजपच्या सर्व खासदारांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतरच्या काळातील बँक खात्याचे तपशील सादर करावेत, असे आदेश मोदींनी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीका केली. याविरोधात आवाज उठवला. सामान्य लोकांना मोदींनी वेटीस धरल्याची टीका झाली. तर काही ठिकाणी मोदींच्या निर्णयाचे स्वागत झाले. 


नोटबंदी झाल्यापासून म्हणजे 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंतच्या बॅंक व्यवहाराचा तपशील सादर करा, असे आदेशच मोदी यांनी भाजपाच्या खासदार आणि आमदारांना दिले आहेत. आता मोदी यांनी भाजप खासदारांना बॅंक डिटेल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजप खासदारांना आपल्या बॅंक खात्याचा तपशील सादर करावा लागणार आहे.


1 जानेवारी रोजी भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे या 23 दिवसाचा बॅंक व्यवहाराचा तपशील सादर करण्याचे आदेश मोदींनी खासदार आणि आमदारांना दिल्याचे सूत्रांनी माहिती आहे. या निर्णयाविरोधात विरोधकांनी संसदेत आणि संसदे बाहेर मोदी सरकारची घेराबंदी केलेली असतानाच मोदी यांनी हा नवा डाव खेळला आहे.