इंग्रजीशिवाय या भाषेतही आता करू शकाल पासपोर्टसाठी अर्ज...
आत्तापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतच तुम्ही पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकत होतात... परंतु, यापुढे आता भारताचा राष्ट्रीय भाषा असलेल्या हिंदी भाषेतही पासपोर्टसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
मुंबई : आत्तापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतच तुम्ही पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकत होतात... परंतु, यापुढे आता भारताचा राष्ट्रीय भाषा असलेल्या हिंदी भाषेतही पासपोर्टसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
परदेश मंत्रालयानं पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हिंदी भाषेचाही पर्याय उपलब्ध करून दिलाय.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अधिकृत भाषेवर आधारित संसद समितीच्या नवव्या अहवालात भाषेसंबंधी केलेल्या शिफारशींना स्वीकार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. हा अहवाल २०११ साली लोकसभेत सादर करण्यात आला होता.
यापुढे नागरिकांना पासपोर्टसाठी हिंदीमध्येही अर्ज डाऊनलोड करता येईल आणि भरताही येईल. शिवाय पासपोर्ट कार्यालयांमध्येही दोन्ही भाषेत अर्ज उपलब्ध असतील.