आता वाहनांची कागदपत्र सांभाळत बसू नका...!
नवी दिल्लीः आता वाहनांची कागदपत्र सांभाळत बसण्याची गरज नाहीय, कारण वाहनधारकांना कागदपत्र सोबत ठेवण्याच्या जाचातून लवकरच सुटका मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच एम-परिवहन ही अॅप सेवा लाँच केली जाणार आहे.
या अॅपच्या माध्यमातून वाहन परवाना, नोंदणी कागदपत्र म्हणजेच आरसीची डिजिटल कॉपी जवळ ठेवता येणार आहे.
वाहतूक पोलिसांनी कागदपत्र किंवा वाहन परवान्याची मागणी केल्यास केवळ कागदपत्रांची स्कॅन कॉपी द्यावी लागणार आहे.
या अॅपमध्ये वाहन परवाना, आरसी, इन्श्युरन्स, पीयूसी अशा कागदपत्रांची स्कॅन कॉपी सेव्ह करता येणार आहे. यासोबतच विविध 20-30 सेवा या अपद्वारे देण्यात येणार आहेत.
प्रायोगिक तत्वावर ही सेवा तेलंगणा आणि दिल्ली या दोन राज्यात सुरु केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लवकरच देशभरात ही अॅप सेवा सुरु करण्यात येणार आहे.