७ दिवसाच्या आत मिळणार पीएफ रक्कम
कर्मचारी भविष्य निधी संस्थेने म्हटलं आहे की, त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा निधी ७ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संस्थेने म्हटलं आहे की, त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा निधी ७ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील पूर्ण हिशोब आणि कागदपत्र सेवा पूर्ण होण्याआधीच तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामगार मंत्रालयाने म्हटलं की, कामगार मंत्री बंगारू दत्तात्रेय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या २६ ऑक्टोबरच्या बैठकीत याबाबतीत घेतल्या गेलेल्या निर्णयावर सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय भविष्य निधी कोषचे आयुक्त (सीपीएफसी) यांनी सांगितलं की, पंतप्रधानांच्या सूचनेवर ईपीएफओने सेवानिवृत्त आणि मृत्यू संबंधी प्रकरणात याबाबतीत ७ दिवसात निधी देण्याचा आणि निवृत्त कर्मचाऱ्याच्या निधी संबंधित सर्व हिशोब आणि कागदपत्र आधीच तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.