नवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता रेल्वे प्रवाशांना कन्फर्म सीट सहज मिळणार आहे. रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर मार्केटिंगचे विक्रम सिंह यांनी झोनल रेल्वेचे चीफ कमर्शल मॅनेजर्सला या बाबत आदेश दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोलन मॅनेजर्सला आदेश देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक झोनसाठी हे लागू असणार आहे. डिस्टेंस रिस्ट्रिक्शनला तत्काळ प्रभावातून संपवण्यात येणार आहे. सिस्टममध्ये मोडिफिकेशनचं काम सुरु झालं आहे.


लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये रिजर्व कोटा हा प्रवासांच्या अंतरावर ठरवला जातो. लांब प्रवास करणाऱ्या प्रवशांना प्राधान्य दिलं जातं. संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये हजारो अशा रेल्वे आहेत ज्यामध्ये डिस्टेंस रिस्ट्रिक्शन आहे. यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. डिस्टेंस रिस्ट्रिक्शन आता रद्द झाल्यानंतर प्रवाशांना जनरल वेटिंग दिली जाईल. ज्यामुळे वेटिंग तिकीट सहज कन्फर्म होईल. रिजर्व क्लासच्या प्रवाशांना अजूनही यातून दिलासा मिळू शकलेला नाही.