पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याचा प्रत्यय गोव्याच्या राजधानी पणजीत ठिकठिकाणी लावलेल्या होर्डींग्सने येत आहे. या होर्डिंग्सच्या घोषवाक्यातून शिवसेनेने आपला मित्रपक्ष सत्ताधारी भाजपाला उघड आव्हान दिलेय. 


शिवसेनेची जागोजागी होर्डिंग्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी पणजीत शिवसेनेने जागोजागी लावलेल्या या होर्डिंग्सने सगळेच अवाक् झालेत. विधानसभा निवडणुकांना काही महिने बाकी असताना आतापासूनच शिवसेनेनं वातावरण तापवायला सुरूवात केलीय. गोव्यात मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये मराठी मते निर्णायक आहेत. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदा या व्होट बँकेचं महत्व लक्षात घेत गांभीर्याने गोव्याच्या भूमीत पाय रोवण्याचा निर्णय घेतलाय.  होर्डिंग्सच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपलाच लक्ष्य करण्यात आलंय.


भाजप पुरस्कृत आघाडीचा पराभव


गोव्यात भाजपचा चेहरा असलेल्या मनोहर पर्रीकर यांना केंद्रात मंत्रीपदावर नेण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या पणजी महापालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत आघाडीला पराभवाचा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर भाजपसमोर गोव्यात सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. 


भाजपच्या डोक्याचा ताप


आम आदमी पार्टीनेही गोवा विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलीये. त्यामुळं शिवसेना आणि 'आप' ने गोव्यात भाजपच्या डोक्याचा ताप वाढवलाय, हे नक्की !