आता बॅंकेतून काढता येणार ५० हजार रूपये
केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध होते. आता २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रूपये काढता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध होते. आता २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रूपये काढता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.
दरम्यान, १३ मार्चपासून एटीएम आणि बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा नसेल. याची घोषणा आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केली आहे. येत्या १३ मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली.
बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येऊ शकते. मात्र, येत्या २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा काहीप्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून ५०,००० रूपये काढता येतील. दरम्यान, २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहिल.