नवी दिल्ली : आधार कार्ड युजर्ससाठी मोठी चांगची बातमी आहे. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार अॅप लॉन्च केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अॅपच्या मदतीने आधार कार्डबाबत अधिक माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकाल. आधार कार्डचे डिटेल्स आपल्या मोबाईलवर तुम्ही सेव्ह करु शकाल. त्यामुळे ई-केवायसी करण्याबरोबर दुसरी कामे तुम्ही सहज करु शकाल. त्यासाठी आधार जरुरी नसेल.


असे अॅप डाऊनलोड करा


आपल्या स्मार्टफोनमधील गूगल प्ले स्टोरमध्ये 'आधार मोबाईल' टाईप करा आणि सर्च करा. डेस्कटॉपवर https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.maadhaarplus यावर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्ड अॅपला आपल्या मोबाईलवर इंस्टॉल करा.


अॅप इंस्टॉल केल्यानंतर आपला आधार नंबर, नाव आणि पिनकोड डिटेल्स भरा. डिटेल्स भरल्यानंतर आपण व्हेरीफिकेशन करावे लागेल. यासाठी अॅपकडून आपल्याला एक एसएमएस आधार सव्हरवरुन पाठवला जाईल. डिटेल्स व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आपला फोटो सहित सर्व डिटेल्स येईल.