देशभरात हायअलर्ट : एनएसजीकडून विमान हायजॅक रोखण्यासाठी प्रयत्न
पीओकेमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणा या हायअलर्टवर आहेत.
नवी दिल्ली : पीओकेमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणा या हायअलर्टवर आहेत.
नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स (NSG) ने सगळ्या भारतीय एयरलाईन्स आणि चार्टर प्लेन ऑपरेटर्सला सांगितलं आहे की, सध्या वापरात असलेल्या प्रत्येक एयरक्राफ्ट त्यांनी एनएसजी कंमाडोसाठी उपलब्ध करुन द्यावेत. एनएसजीचे कमांडो या विमानांच्या डिजाइननुसार अँटी हायजॅक ड्रिल्सची प्रॅक्टिस करणार आहेत.
भविष्यात जर विमान हायजॅक सारखी स्थिती घडली तर त्यावर कशी कारवाई करावी यासाठी मदत होईल. इंडियन एयरलाइंसने एनएसजीसमोर एक अट ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी एक अँटी हायजॅक ड्रिलदरम्यान एका एयरक्राफ्टच्या इंटेरिअरला नुकसान झालं होतं. त्यानंतर डीजीसीएला माहिती दिली गेली होती त्यानंतर यावर वाद झाला होता.
विमानाला होणाऱ्या नुकसानीला हे एकच कारण जबाबदार नाही आहे. २ वर्षांपूर्वी एनएसजीने बोइंग 747 जम्बो जेटमध्ये अशीच एक ड्रिल केली होती. हे विमान पीएम नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. नंतर विमानात तपास सुरु असतांना एक हँड बॉम्ब मिळाल्याने भीती पसरली होती पण नंतर कळालं की तो एक निष्क्रीय केलेला बॉम्ब आहे. त्यामुळे हा सराव झाल्यानंतर एनएसजीने त्यांच्या प्रत्येक वस्तू या काळजीपूर्वक विमानातूक घेऊन जाव्यात अशी त्यांची मागणी आहे.