लग्नानंतर तिला पाठवायचा अश्लील मेसेजेस, फोटोज
तंत्रज्ञान वाढीस लागल्यापासून सायबर क्राईमच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्यात. स्मार्टफोनवरुन अश्लील मेसेजेस पाठवणे, फोटोज पाठवून मुलींना त्रास देणे अशा घटना शहरांमध्ये घडत असतात. अशीच घटना ग्वालियरमध्ये एका विवाहित तरुणीसोबत घडलीये.
ग्वालियर : तंत्रज्ञान वाढीस लागल्यापासून सायबर क्राईमच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्यात. स्मार्टफोनवरुन अश्लील मेसेजेस पाठवणे, फोटोज पाठवून मुलींना त्रास देणे अशा घटना शहरांमध्ये घडत असतात. अशीच घटना ग्वालियरमध्ये एका विवाहित तरुणीसोबत घडलीये.
गेल्या काही दिवसांपासून 23 वर्षीय विवाहित तरुणीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन अश्लील मेसेजेस, तसेच फोटो पाठवले जात होते. सुरुवातीला तिने याकडे लक्ष दिले नाही. मात्र त्यानंतरही मेसेजेस तसेच अश्लील फोटोजचे प्रमाण वाढू लागल्यानंतर तिने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला.
जेव्हा त्या नंबरवर कॉल करण्यात आला तेव्हा त्या अनोळख्या व्यक्तीने पैसे द्या अन्यथा पीडित महिलेची फोटोच्या सहाय्याने बदनामी करु अशी धमकी दिली. अखेर त्या तरुणीने आणि तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.